Maval News: तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज – तोक्ते चक्रीवादळाचा मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. घर, गोठे, शेती फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या पॉली हाऊस, आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करावेत. योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी केली आहे.

याबाबत तहसीलदार मधुसुधन बर्गे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात खांडभोर यांनी म्हटले आहे की, तोक्ते चक्रीवादळाचा मावळ तालुक्याला ही फटका बसला आहे. मावळमध्ये सलग दोन दीवस मोठ्या प्रमाणावर वादळ वारे, पावसामूळे अनेक घराचे, गोठे, फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या पॉली हाऊस, फळ (आंबे )व इतर मालमत्ताचे, इतर छोटे मोठे व्यवसाईक यांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे योग्य त्या अधिकाऱ्यांमार्फत तातडीने पंचनामे करावेत. सर्व नुकसानग्रस्तांना योग्य ती भरपाई द्यावी. ज्यांचे खरच नुकसान झाले आहे. असे एकही नुकसान ग्रस्त भरपाई पासून वंचित राहणार नाही. याची काळजी आपण घ्यावी. गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्री वादळमध्ये नुकसान झालेल्या सर्वांना महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात मदत दिली होती.

कोणीही भरपाई पासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेतली होती. पण, जे खरच नुकसान ग्रस्त होते. त्यांना शासनाच्या पाहणी करायला आलेल्या काही अधिकारी वर्गाने आधीकारी वर्गांने वंचित ठेवले होते. आता तसे होऊ नये यासाठी होता आपण स्वतः लक्ष घालावे. ज्यांचे खरच नुकसान झाले आहे. अशा सर्व नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करावतेत. योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खांडभोर यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.