Maval News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथे लसीकरण अभियान

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ भाजपच्या वतीने मावळ तालुक्यात 12 हजार लसींचे महालसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथील लसीकरण केंद्रावर भाजप पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देत पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा केला.

आज शुक्रवार (दि.17) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळात होत असलेल्या 12 हजार महालसीकरण अभियानाच्या अनुषंगाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथील लसीकरण केंद्रावर मावळ लोकसभा प्रभारी प्रशांत ढोरे,भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप काकडे आदी प्रमुख उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महालसीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थित कार्ला आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ.पोळ, मच्छिंद्र केदारी, दत्ता कोंडभर, दत्तात्रय पडवळ, नवनाथ कडु, अमोल केदारी, सचिन येवले, शेखर दळवी, लतीप शेख, अमोल भेगडे, सागर शिंदे, संतोष तिकोने आदी उपस्थित होते.

यावेळी लसीकरणासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधत नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देत देशभरामध्ये 75 कोटी लसीकरण व मावळमध्ये 2 लाख 75 हजार मोफत लसीकरणाचा टप्पा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण झाला असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली.

याचसोबत नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती देऊन पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मोफत लस उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले व मोदी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.