Maval Crime News : मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा हवेत गोळीबार करतानाचा ‘व्हिडीओ’ व्हायरल

एमपीसी न्यूज –  मावळ तालुक्यातील चांदखेड गावातील यात्रेत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार करणारा आरोपी अविनाश गोठे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी (Maval Crime News) असल्याचे समोर आले आहे. या पदाधिका-याने भरदिवसा हवेत गोळीबार केल्याचा ‘व्हिडीओ’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अशा गावगुंडांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदे दिल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला कशाची मस्ती आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया मावळवासीयांकडून येत आहेत.

चांदखेड गावात नुकतीच जत्रा पार पडली. मावळ तालुक्यासह इतर ठिकाणाहून देखील नागरिक यात्रेचा आनंद घेण्यासाठी आले होते. यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यात्रेतील गर्दीचा फायदा घेत अविनाश गोठे याने गावात दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:कडील पिस्तूल बाहेर काढले आणि हवेत गोळीबार केला.  तसेच गाड्यांच्या काचा फोडल्या. कोयत्याने फ्लेक्स फाडले होते. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारामुळे जत्रेला (Maval Crime News) आलेल्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

Pune : लोखंडी पाईप चोरणाऱ्या टोळीला अटक

आता गोठे याचा हवेत गोळीबार करतानाचा ‘व्हिडीओ’ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे हवेत गोळीबार करणारा गावगुंड अविनाश गोठे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. गोठे हा राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियनचा मावळ तालुक्याचा अध्यक्ष आहे. विशेष म्हणजे गोठे याला राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी  नियुक्तीचे पत्र दिले होते. अशा गावगुंडाना राष्ट्रवादीकडून (Maval Crime News) पद दिल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशा गावगुडांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Pimpri news : वृद्धाश्रम ओस पडतील तेव्हा भारतीय संस्कृती जगात महान होईल – अविनाश भारती 

दरम्यान, याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी अविनाश बाळासाहेब गोठे (वय. 22 रा. चांदखेड) याच्यासह विजय अशोक खंडागळे (वय. 18, रा. चांदखेड), मनिष शिवचरण यादव (वय.20 रा.चांदखेड), अमर उत्तम शिंदे (वय.22, रा.परंदवडी, ता. मावळ), अनिकेत अनित पवार (वय 26, रा. थेरगाव) यांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.