Maval News : राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव 2021 (तिथिप्रमाणे) निमित्त व्यासपीठ पूजन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे संपन्न होणाऱ्या राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव 2021 (तिथिप्रमाणे) च्या व्यासपिठाचे पूजन सोमवार (दि 22) संपन्न झाले.

त्याप्रसंगी शिवजयंती महोत्सवाचे संस्थापक भास्करआप्पा म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल पगडे, नामदेव भसे, नारायण ढोरे, किरण भिलारे, नामदेव वारिंगे, प्रसाद पिंगळे, सोमनाथ काळे, सुधाकर ढोरे, दिपक पवार, अनिश तांबोळी, अनिल ओव्हाळ, रमेश ढोरे, शेखर वहिले,रविंद्र काकडे, दिपक भालेराव, समिर गुरव, मंदार काकडे, काशिनाथ भालेराव, अतुल म्हाळसकर आदी उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. 29 , 30 आणि 31 मार्च रोजी संपन्न होणाऱ्या या महोत्सवाची रूपरेषा आणि कार्यकारिणी खालील प्रमाणे असेल.

सोमवार दि.29 मार्च रोजी सकाळी ग्रामदैवत पोटोबा मंदिर प्रांगणात दगडी गोटी उचलणे ही स्पर्धा संपन्न होणार असून विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

दुपारी 3 ते 6 यावेळेत विविध प्रकारचे आरोग्य शिबीर संपन्न होईल यामध्ये नामवंत डॉक्टर यांच्याद्वारे वडगांवकर नागरिकांना वैद्यकीय तपासणी, उपचार आणि मार्गदर्शन लाभणार आहे.

मंगळवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शिवव्याख्याते हभप प्रविण महाराज दुशिंग यांची किर्तनसेवा संपन्न होईल. बुधवार दि. 31 मार्च रोजी सकाळी शिवप्रतिमा पूजन, शिवज्योत आगमन आणि स्वागत तसेच शिवजन्मोत्सव संपन्न होईल.

सायंकाळी 5 वाजता राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक आणि तदनंतर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न होईल.

महोत्सवाचे हे 42 वे वर्ष असून कोरोना बाबतीत शासनाचे सर्व नियमांचे पालन करून महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर आणि अध्यक्ष अमोल पगडे यांनी दिली

पुरस्कारार्थी –
राजमाता जिजाऊ पुरस्कार – सुशीला अण्णासाहेब शेलार

कृषिनिष्ठ पुरस्कार – धोंडिबा विठ्ठलराव जाधव

कर्तव्यदक्ष पुरस्कार – डॉ. भगवानराव अंतू पवार – जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे

हृदयमित्र समाजभूषण पुरस्कार – लायन हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल

क्रीडारत्न पुरस्कार – तानाजी संभाजीराव काळोखे

या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे

कार्यकारिणी 2021
अध्यक्ष – अमोल पगडे
कार्याध्यक्ष – शंकर भोंडवे
कार्यक्रम प्रमुख – दिनेश ढोरे
उपाध्यक्ष – अनिल ओव्हाळ , निलेश द.म्हाळसकर , समीर गुरव
खजिनदार – अतुल म्हाळसकर
सहखजिनदार – अतुल राऊत
सचिव – शेखर वहिले
सह सचिव – मंदार काकडे
प्रसिद्धी प्रमुख – विकी द.म्हाळसकर, केदार बवरे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.