Maval News : साते स्मशानभूमीतील मृतदेह दहन स्टॅन्ड चोरणारा चोरटा वडगाव पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – साते स्मशानभूमीतील 1200 रुपये किंमतीचा लोखंडी मृतदेह दहन स्टॅन्ड चोरणाऱ्या चोरट्याला वडगाव पोलिसांनी रंगेहात पकडले.

ही घटना मंगळवारी (दि.23) पहाटे साते ता. मावळ हद्दीत घडली. उमेश रघुनाथ गावडे यांनी वडगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली.

मावळ न्यायालयाने आरोपीला गुरुवार (दि.25) पर्यंत पोलीस कोठडी दिली. विशाल अकुंश मराठे (वय 30, रा. वराळे , ता. मावळ जि. पुणे.) असे कोठडीत असलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार साते व जांभूळ परिसरात स्मशानभूमीतील लोखंडी मृतदेह दहन स्टॅन्ड चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती.

आरोपी विशाल मराठे हा त्याची दुचाकी एम एच 14 ए क्यु 9043 घेऊन साते स्मशानभूमीतील 1200 रुपये किंमतीचे मृतदेह दहन स्टँन्डच्या 40 कीलो वजनाच्या तीन लोखंडी प्लेट व प्लेटांचे तुकडे चोरुन घेऊन जात असताना, ग्रामस्थांनी रंगेहात पोलिसांकडे पकडून दिले.

वडगाव पोलिसांनी आरोपी मराठे याला मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायाधिशांनी मंगळवारी (दि.23) दुपारी 2:30 वा. आरोपीला गुरुवार (दि.25) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी रवींद्र राय करत आहेत. या आरोपी कडून अनेक ठिकाणच्या चोऱ्या उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.