Maval News: वारकरी संप्रदायातील कार्यकर्ते ज्ञानोबा सुतार यांचे निधन

तळेगाव दाभाडे – आढे (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री ज्ञानोबा भाऊ सुतार (वय 75 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

प्रगतीशिल शेतकरी रोहिदास सुतार,   देवीदास सुतार, सोमनाथ सुतार व जयहिंद कंपनीचे गुणवंत कामगार नवनाथ सुतार यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.