Maval News : आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – आदिवासी बांधवाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे व त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन आमदार सुनिल शेळके यांनी वडगाव मावळ येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

शेळके पुढे बोलताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन मागील वर्षभरात तालुक्यातील आदिवासी गावांतील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी वसतीगृह झाले पाहिजे तसेच शासनाच्या योजना गावा- गावांतील आदिवासी समाजापर्यंत पोहचविण्याची आमची जबाबदारी असणार आहे. आदिवासी बांधवांच्या लढ्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असेही आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सभापती शंकर सुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम,आदिवासी सेलचे अध्यक्ष विक्रम हेमाडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, दिपक हुलावळे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष नारायण ठाकर, मावळ तालुका युवक काँगेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड, सुनिल दाभाडे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, महिला तालुका अध्यक्ष सुवर्णा राऊत, नवनाथ चोपडे, संजय शेडगे, अतुल राऊत, सरपंच अनंता पावसे, राजेश कोकाटे, निलेश पावसे, प्रमोद भोईर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिवीरांना, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या क्रांतीकारकांना व पवना बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करून करण्यात आली.

याकार्यक्रमात राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष नारायण ठाकर, सरपंच अनंता पावसे, राजेश कोकाटे, प्रमोद भोईर व या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती शंकर सुपे यांनी मनोगते व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.