Maval News : आग्रा ते राजगड गरुडझेप मोहितेत सहभागी झालेल्यांचे वडगाव मावळ येथे जंगी स्वागत

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देत आग्र्याहून 29 ऑगस्ट या दिवशी राजगडावर परतले होते. या घटनेस 350 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेची आठवण म्हणून पुण्यातील शिवभक्त मारूती गोळे यांच्या नेतृत्वाखाली शिवज्योत घेऊन आग्रा ते राजगड हे एक हजार 300 किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण करत वडगाव येथे परतले.

आग्रा ते राजगड गरूडझेप या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी झालेल्या शिलेदारांचे नगराध्यक्ष मयुर ढोरे व ग्रामस्थांच्या वतीने वडगाव येथे जंगी स्वागत करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देत आग्र्याहून 29 ऑगस्ट या दिवशी राजगडावर परतले होते.या घटनेस 350 वर्ष पूर्ण होत आहे. या घटनेची आठवण म्हणून पुण्यातील शिवभक्त मारूती गोळे यांच्या नेतृत्वाखाली शिवज्योत घेऊन आग्रा ते राजगड हे 1300 किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण करत वडगाव येथे परतले.

गरूडझेप मोहिमेचे वडगाव येथील शिलेदार वडगाव शहरात येताच त्यांचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने जल्लोषात वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

सरनोबत नरवीर पिलाजीराव गोळे यांचे 14 वे वंशज मारूती गोळे यांच्या नेतृत्वाखाली लाल किल्यापासून या मोहिमेला शुभारंभ झाला होता. या मोहिमेत वडगाव येथील गणेश जाधव, श्रीनिवास कुलकर्णी, नितीन चव्हाण, शामराव ढोरे, अंकेश ढोरे, ॲड. रविंद्र विनोदे, मनोज जाधव, हनुमंत जांभुळकर, विशाल शिंदे, अतुल ढोरे, गुरूदास मोहोळ, दत्ता म्हाळसकर, भार्गव बोरकर, आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, उपनगराध्यक्षा पुजा वहिले, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, मंगेशकाका ढोरे, बाळासाहेब ढोरे, सुनील चव्हाण, बिहारीलाल दुबे, ॲड रविंद्र यादव, बापूसाहेब वाघवले, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, राहुल ढोरे, माया चव्हाण, पुनम जाधव, शारदा ढोरे, रविंद्र काकडे व ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आग्रा ते राजगड गरूडझेप ही ऐतिहासिक मोहिम पूर्ण करून हे शिलेदार शहरात दाखल होताच त्यांची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. शिवस्मरण ज्योतीचे व शिलेदारांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. तसेच व्यापारी बांधव व ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.