Maval News: तळेगाव, वडगाव, कामशेत व लोणावळ्यात पुढील सहा दिवस काय चालू, काय बंद?

एमपीसी न्यूज – मावळातील वाढती  कोरोना रुग्ण संख्या पाहता तळेगाव, वडगाव, कामशेत व लोणावळ्यात उद्यापासून सहा दिवस (7 ते 12 मेे) कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घेऊयात या कालावधीत काय सुरू राहणार तसेेच काय बंद राहणार?

मावळ तालुक्यातील वाढती कोविड रुग्णसंख्या लक्षात घेता उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती सभागृह मावळ येथे प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मावळचे प्रभारी तहसीलदार रावसाहेब चाटेे यांनी याबाबत माहिती दिली.

या सेवा-सुविधा सुरु राहणार

1) सर्व रुग्णालये, दवाखाने, डायग्नोस्टीक सेंटर, वैद्यकीय प्रयोगशाळा

2) औषधे व वैद्यकीय साधनांची दुकाने

3) दूध वितरण सकाळी सात ते नऊ

4) पेट्रोल-डिझेल पंप, सीएनजी पंप, एलपीजी सिलिंडर वितरण

5) सार्वजनिक वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी

6) अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास

7) नगरपालिका क्षेत्राबाहेरील कंपन्या, उद्योग

8) बँका व वित्तीय संस्था

या सेवा-सुविधा बंद राहणार

1) किराणा मालासह सर्व प्रकारची दुकाने, मॉल

2) भाजीपाला, फळांची विक्री

3) अंडी, मांस – मच्छी विक्री

4) अनावश्यक प्रवास

5) खासगी व्यवसाय व कार्यालये

हा लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी  उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणांना व पोलीस स्टेशन प्रमुख यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.

 

मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, समाजसेवी संघटना व  नागरिकांनी देखील या काळात नियमांचे पालन करावे व यंत्रणेला सहकार्य करावे.  जेणेकरून सर्वांच्या सहकार्याने कोविडचा वाढता प्रादुर्भाव आपल्याला रोखणे शक्य होईल, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी  जाधव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.