Maval News: आमदार शेळके यांच्या प्रयत्नाने मावळात 704 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध

कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा

एमपीसी न्यूज – सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे दोन दिवसांत मावळात 704 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रभावी उपचारांसाठी प्रामुख्याने लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेत उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत आहेत तर वेळेत इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी आमदार शेळके प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मावळातील श्री हॉस्पिटल (वराळे) 34 , मातोश्री हॉस्पिटल (वडगाव) 15 , बढे हॉस्पिटल (कामशेत) 40 , महावीर हॉस्पिटल (कामशेत) 32 , संजीवनी हॉस्पिटल ( लोणावळा ) 23, कृष्णदीप हॉस्पिटल (कामशेत) 9, संजीवनी हॉस्पिटल (कामशेत) 9, तळेगाव जनरल हॉस्पिटल 22 , पुण्योदय हॉस्पिटल (कामशेत) 20, नित्यसेवा हॉस्पिटल (कामशेत) 12 , माऊली हॉस्पिटल (वडगाव) 11, समर्थ हॉस्पिटल (तळेगाव) 31, ढाकणे हॉस्पिटल (तळेगाव) 29, ओम हॉस्पिटल (सोमाटणे) 12, पवना हॉस्पिटल (सोमाटणे) 80, स्पर्श हॉस्पिटल (सोमाटणे ) 84, मायमर हॉस्पिटल 131, पायोनीयर हॉस्पिटल (सोमाटणे) 46, अथर्व हॉस्पिटल (तळेगाव) 64 अशी एकूण 704 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण भागातील जनतेला उपचारासाठी इंजेक्शनची नितांत आवशकता असून ती उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आमदार शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता मावळातील ज्या हॉस्पिटल मध्ये रुग्ण उपचार घेत आहेत अशा हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यास मदत होणार आहे, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.