Maval News : तालुक्यातील पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाचे कामे मार्गी लावा – आमदार सुनिल शेळके 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील देहूरोड सेंट्रल ते कार्ला दरम्यान वारंवार वाहतूक कोंडी व अपघात होणाऱ्या सहा ठिकाणी उड्डाणपुल करण्याची मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोमवारी (दि.4) केली.

मावळ तालुक्यातील देहूरोड सेंट्रल, सोमाटणे, लिंब फाटा (तळेगाव दाभाडे), वडगाव – तळेगाव दाभाडे फाटा, कान्हे फाटा व कार्ला आदि ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून अनेकांचा बळी गेला आहे.

_MPC_DIR_MPU_II

मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर या ठिकाणी उड्डाणपुल नसल्याने महामार्ग हा अपघाताचा झाला असून वाहतूक संथगतीने तसेच अडथळ्याची ठरत आहे. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाऊन या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्यासाठी निधीची मागणी केली.

तळेगाव दाभाडे – चाकण राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मावळचे आमदार शेळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी देहूरोड सेंट्रल ते कार्ला दरम्यान वारंवार वाहतूक कोंडी व अपघात होणाऱ्या सहा ठिकाणी उड्डाणपुल करण्याची मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.