Maval News: वाढदिवसानिमित्त एक हजार महिलांना घडवले जेजुरी, मोरगाव, पंढरपूर दर्शन

टाकवे बुद्रुक येथील बाबाजी गायकवाड यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील माजी सरपंच व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक हजार महिलांना देवदर्शन यात्रा घडवली. जेजुरीचा खंडोबा, मोरगावचा गणपती आणि पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाचा टाकवे, फळणे, बेलज, घोणशेत कचरेवाडी येथील एक हजार महिलांनी या दर्शनाचा लाभ घेतला.

अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत बाबाजी गायकवाड यांच्याकडून कोरोनाचा काळ वगळता मागील चार वर्षांपासून हा उपक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त सातत्याने करत आहेत. यंदाही महिलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देवदर्शन यात्रा काढल्याबद्दल महिलांनी आभार व्यक्त करत पुढील राजकीय वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

देवदर्शनासाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या बसचे पुजन व वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन समिती पुणे जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, उद्योजक सुधाकर शेळके,शिवसेना तालुकाध्यक्ष राजेश खांडभोर,संजय गाधी निराधार योजना तालुका अध्यक्ष नारायण ठाकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अंकुश आंबेकर, डाहुलीचे सरपंच नामदेव शेलार, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे,सुनील दंडेल, माजी सरपंच सुरेश चोरघे,रमेश जाचक उपस्थितीत होते

पप्पू कोद्रे,विष्णू जांभुळकर,भाऊ ढोरे, रोहीदास कोंडे,सनी असवले, दत्ता लोढे, चंद्रकात आमले, अमोल गायकवाड, किरण गायकवाड, मनोज काटकर, सोमनाथ जाभुळकर, बाळासाहेब असवले, नवनाथ गायकवाड,विकास एकतपुरे, प्रकाश करवंदे, सचिन गायकवाड, हारीदास मालपोटे,
भरत असवले,संतोष लष्करी,किशोर गावडे, दिपक शिदे, योगेश गुणाट, सौरभ ननवरे, राघु मोरमारे, समिर धनवे ,प्रशांत जाधव,अवि जाधव आदींनी देवदर्शन यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.