Maval : निवडणूक पैशाने नव्हे निष्ठेने जिंकवी लागते – नितीन मराठे

वराळे येथे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत; 'कहो दिलसे, बाळाभाऊ फिरसे' च्या दिल्या घोषणा

एमपीसी न्यूज – जे पैशाच्या जीवावरती पक्षनिष्ठा बाजूला ठेऊन जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना मावळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या रूपाने पक्षनिष्ठा आणि विकासालाच जनता मत देणार, असे मत जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी प्रचारादरम्यान झालेल्या सभेत व्यक्त केले.

वराळे येथे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे नागरिकांकडून रविवारी जोरदार स्वागत झाले. रविवारी सर्व प्रचार दौरे रद्द असूनही गावाने केलेल्या आग्रहास्तव भेगडे यांनी स्वतःची कामे बाजूला ठेऊन नागरिकांच्या विनंतीला मान देत त्यांना प्राधान्य दिल्याने नागरिकांनी भेगडे यांचे तोंडभरून कौतुक केले. स्वागतादरम्यान लहान मुलांसह तरुणांनी हातात झेंडे घेऊन ‘कहो दिलसे, बाळाभाऊ फिरसे’ अशा घोषणा दिल्या.

मावळ तालुका भाजप प्रभारीचे भास्करआप्पा म्हाळसकर म्हणाले, राज्यमंत्र्यांनी राबविलेल्या महायज्ञ आरोग्य शिबिराचा मावळ तालुक्यातील ६० ते ७० हजार नागरिकांना फायदा झाल्यामुळे आज नागरिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम झालेला आहे

सरपंच मनीषा निलेश शिंदे म्हणाल्या, गावामध्ये रस्त्यांची कामे, विजेची कामे सरकारने राबविलेल्या घरकुल योजना, विमा योजना आणि बांधकाम मजूर योजना यांचा गावातील खूप लोकांना फायदा झाला आहे. तसेच स्त्रियांसाठी शेळीपालन, पीठगिरण, शिलाई मशीन अशा प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वबळावर उभे राहण्यास मदत केली. गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गोठ्याची सोय होण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

यावेळी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन बाळा भेगडे यांचा सन्मान केला आणि गावासाठी दिलेल्या सुख-सोयींबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी गावातील तरुण तरुणींना राज्यमंत्री समवेत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. विकासाचा दृष्टिकोन आणि राजकीय प्रलगभता असलेले सर्वसमावेशक नेतृत्व बाळा भेगडे असल्याने आमचे मत त्यांना असा निर्धार यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.