Maval: फक्त निवडणुकीसाठी नव्हे तर, मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन – पार्थ पवार

पराभवानंतर पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विट करत दिली प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाल्यानंतर अखेर पाच दिवसांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फक्त एका निवडणुकीसाठी नाही. तर, मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहिन, अशा आशयाचे सोशल मीडियावर ट्विट करत पार्थ पवार यांनी पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र असलेल्या पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात धक्कादायकरीत्या पराभव झाला. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ यांचा तब्बल सव्वा दोन लाखाच्या मताधिक्याने पराभव केला.

  • पार्थ पवार यांच्या रूपाने 50 वर्षात पहिल्यांदाच पवार घराण्यातील सदस्याचा पराभव झाला आहे. पवार कुटुंबातील सदस्याच्या पराभवाची राज्यभर चर्चा होत आहे. त्यातच पराभव झालाल्यानंतर पार्थ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

अखेर पराभवानंतर पाच दिवसांनी पार्थ पवारांनी मौन सोडल आहे. फक्त एका निवडणुकीसाठी नाही. तर, मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहिन, अशा आशयाचे सोशल मीडियावर ट्विट करत पार्थ पवार यांनी पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • मावळमधील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि महाआघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केलेल्या कठोर परिश्रमासाठी मी त्यांचे मन:पुर्वक आभार मानतो, असेही पार्थ यांनी आपल्या ‘ट्विट’ मध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.