Maval : किल्ले बनवा स्पर्धेच्या मोठ्या गटात ओमकार फाकटकर तर, लहान गटात ओम गाडेने पटकाविला प्रथम क्रमांक

बजरंग दल, विहिंप, सुदुंबरे मावळ यांच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन; मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

एमपीसी न्यूज – विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, सुदूंबरे, मावळ आयोजित ‘दिपावली उत्सव किल्ले बनवा स्पर्धा 2019’ चे आयोजन केले होते. यात लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. यातील मोठ्या गटात ओमकार संतोष फाकटकर तर, लहान गटात ओम गणेश गाडेने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. 3 ऑक्टोबर) अस्मिता भवन येथे पार पडला. कार्यक्रमात डॉ. प्रमोद बोराडे यांचे ‘भारताची दुर्ग संस्कृती’ या विषयावर व्याख्यान झाले. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्षे होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि शिवमूर्ती पूजन करून झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगावनगरीचे सामाजिक कार्यकर्ते, नंदू काळोखे होते. तसेच बजरंग दलाचे सोलापूर विभाग संयोजक संदेश भेगडे, धर्मजागरण समितीचे सुमित हगवणे, लोहगड विसापूर विकास मंचाचे अध्यक्ष संदीप गाडे, सुदुंबरे ग्रामपंचायत सदस्या उमा शेळके, भारती आंबोले, भाजप तालुका उपाध्यक्ष धनंजय गाडे, विशाल गाडे, बापू बोरकर, सुदवडीचे उपसरपंच रमेश कराळे, दत्ताञय गाडे, चंद्रकांत जंबुकर, मनसे नेते विनायक गाडे अनिल गाडे, राहुल गाडे संतोष गाडे, संदीप बारणे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लहानपणापासूनच मुलांच्यात छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि गड किल्यांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी, म्हणून दरवर्षी विश्व हिंदू परिषद,
बजरंग दलच्या वतीने “धर्मो रक्षति रक्षित:” आणि “सेवा सुरक्षा संस्कार” अंतर्गत किल्ला बनवा स्पर्धांचे आयोजन करून छत्रपती शिवरायांचा इतिहास लहान मुलांच्यात रुजविण्यावर भर दिला जातो.

उमा शेळके ग्रामपंचायत सदस्या यांच्या वतीने रोख रक्कम व लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने शिवमूर्ती, बजरंग दलातर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना बजरंग दलाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सुदुंबरे व परिसरातील किल्ले परीक्षण लोहगड विसापूर विकास मंचचे अध्यक्ष संदीप गाडे, बजरंग दल देहूगाव संयोजक निखिल पिंजन यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन गणेश काळडोके, हृषीकेश कुसूमकर, गजानन गाडे, कुणाल गाडे, अक्षय गाडे, गौरव सुर्यवंशी, सुयश काळोखे, अक्षय खोल्लम, चंद्रकांत साळुंके, सोन्या बाळसराफ, ओमकार फाकटकर, प्रविण शेळके, संकेत गाडे, अनिकेत होनावळे,तुषार टिळेकर यांनी केले.

सूञसंचालन विश्व हिंदू परिषद संचलित गोपाळराव देशपांडे वसतिगृहाचे माजी विद्यार्थी रोहिदास गाडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास काळोखे यांनी केले. तर, स्वप्निल आंबोले यांनी आभार मानले. मयुर गाडे यांनी शिववंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
मोठा गट :
प्रथम क्रमांक :
ओमकार संतोष फाकटकर याने मिळवला. संघ स्वयंसेवक संजय किसन गाडे यांच्या वतीने रोख रक्कम व लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने शिवमूर्ती व बजरंग दलातर्फ़े प्रशस्तीपत्र देण्यात आले.
व्दितीय क्रमांक : मृणाली माणिक गाडे हिने मिळवला. भाजपा तालुका उपाध्यक्ष धनंजय गाडे यांच्या वतीने रोख रक्कम, लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने शिवमूर्ती व बजरंग दलातर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
तृतीय क्रमांक : भूषण तडस / विजय शिंदे यांनी मिळवला. युवा अध्यक्ष विशाल गाडे यांच्या वतीने रोख रक्कम,लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने शिवमूर्ती व बजरंग दलातर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.

लहान गट : 
प्रथम क्रमांक : ओम गणेश गाडे यांने मिळविला. बजरंग दल कार्यकर्ते विकास काळोखे यांच्या वतीने रोख रक्कम, लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने शिवमूर्ती व बजरंग दलातर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
द्वितीय क्रमांक : सिध्दी तुकाराम पानमंद याने मिळविला. बजरंग दल कार्यकर्ते गजानन गाडे यांच्या वतीने रोख रक्कम व लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने शिवमूर्ती,बजरंग दलातर्फ़े प्रशस्तीपत्र देण्यात आले.
तृतीय क्रमांक : ओम योगेश बोरकर याने मिळविला. उमाताई शेळके ग्रामपंचायत सदस्या यांच्या वतीने रोख रक्कम व लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने शिवमूर्ती, बजरंग दलातर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना बजरंग दलाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.