Maval : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकाला अटक; विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

One arrested for having sex with a minor girl; Filed a crime of atrocity with indecency

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी अकराच्या सुमारास नानोली ( ता. मावळ) येथे घडली.

सोन्या उर्फ सोमनाथ रघुजी काळे (वय 33, रा. नानोली, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रविवारी सकाळी फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने फिर्यादी यांच्या नातीसोबत अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला.

घटनेनंतर फिर्यादी यांनी हा प्रकार त्यांच्या मुलाला सांगितला. त्यानंतर सोमवारी (दि. 8) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भारतीय दंड विधान कायदा कलम 354 ब, 452, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8, 12, अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 कलम 3(1) (w) (i), 3(2),3(V),3(2)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.