BNR-HDR-TOP-Mobile

Maval : पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.

मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया उद्या (गुरुवारी) सकाळी आठ वाजल्यापासून बालेवाडी येथे होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला वाघेरे यांनी पार्थ पवार मावळातून खासदार होणारच आहेत, असा दावा केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, उरण आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना मोठे मताधिक्य मिळेल. पनवेल आणि मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये थोडे मताधिक्य मिळेल. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सम-समान मते मिळतील. समान मते झाली नाही. तरी मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळतील, असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केले.

पवार घराण्याचा पहिला पराभव माझ्याकडून होणार असल्याचा दावा शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला असल्याबाबत विचारले असता वाघेरे म्हणाले, “तो त्यांचा विषय आहे. मावळ मतदारसंघातील लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. तो भ्रमनिरास उफाळून आलेला आहे. त्याचे रुपांतर उद्या पार्थ पवार यांच्या विजयात होईल “, असा दावा वाघेरे यांनी केला.

.