BNR-HDR-TOP-Mobile

Maval : दारुण पराभवानंतर पार्थ पवार म्हणतात………

एमपीसी न्यूज – पवार घराण्यातील तिस-या पिढीचे पार्थ पवार यांना राजकारणातील सुरुवातीलाच पराभवाला सामोरे जावे लागले. मावळ लोकसभा मतदारसंघातून तब्बल दोन लाख 17 हजार 763 मतांनी पार्थला पराभव पहावा लागला. पवार घराण्याला देखील पहिलाच आणि एवढ्या मताने पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पवार घराण्याला पराभवाची चव चाखायला लावली.

पराभव झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा पार्थ पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या प्रतिक्रियेत पार्थ पवार म्हणतात…..सुरुवातील माझ्या सर्व मतदारांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या लहान थोर व्यक्तींनी मदत केली. त्या सर्वांचे देखील आभार मानतो. आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या भविष्यात सुधारण्याचा प्रयत्न करेन. मोदी सरकारला जनतेने स्वीकारले आहे. निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचे मनापासून अभिनंदन.

दरम्यान, पार्थ यांचे वडील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या दोन दिवसात पराभवाचा आढावा घेणार आहेत. पराभवाची कारणमीमांसा करणार आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3