Maval : ……. म्हणून नवख्या पार्थला फासावर लटकवता का ? – अजित पवार

'वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरुकडे जाणे चूकच'

एमपीसी न्यूज – दापोडीतील वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरुकडे जाण्याचे पार्थ याचे कृत्य चुकीचेच होते. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. मात्र, मी त्याला समजावून सांगितल्याचे सांगत पार्थ तरुण आहे. तो चुकला तर लगेच फाशी द्याल का ? असा सवाल पार्थचे वडील अजित पवार यांनी केला. पंढरपूर मध्ये बोलत असताना त्यांनी पार्थची पाठराखण केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ निवडणूक लढवित आहेत. अडखळत केलेले पहिले भाषण, लोकलने उलट्या दिशेने केलेला प्रवास, विनाकारण पळापळ आणि मावळमधून निवडणूक का लढवत आहात ? या प्रश्नाला दिलेले अजब उत्तर अशा विविध कारणावरून पार्थ यांना नेटिझन्सकडून ट्रोल केले जात आहे.

दापोडीतील विनियार्ड चर्चेचे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हे आणि जयश्री सिल्व्हे यांची शनिवारी (30) भेट घेतल्याने पुन्हा पार्थ ट्रोल झाले होते. असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हे दावा करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे पार्थ यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.

यानाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जाव लागत. ही गोष्ट अजित पवारांनी केली असती. तर, ती चूक ठरली असती. पण पार्थकडून ते नकळत झाले. पार्थ तरुण आहे. तो चुकला तर लगेच फाशी द्याल का?” असा सवालही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.