BNR-HDR-TOP-Mobile

Maval: राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत पार्थ पवारांचे नाव नाही! मावळातील उमेदवारीचे गुपित कायम; उत्सुकता शिगेला पोहोचली

राष्ट्रवादीतर्फे 11 उमेदवारांची यादी जाहीर; मावळ, शिरूरचे उमेदवार 'वेटिंग'वर

2,378
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मावळमधून तीव्र इच्छुक असलेले पार्थ पवार यांचे या यादीत नाव नाही. त्यामुळे मावळातील उमेदवारीचे गुपित कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचा, असा सल्ला देत पुन्हा एखदा गुगली टाकली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला असताना आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही. त्यामुळे मावळतील उमेदवारीचे गुपित कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामुळे मावळ, शिरूरचे उमेदवार ‘वेटिंग’वर ठेवले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आहेत 11 उमेदवार:
# सुप्रिया सुळे- बारामती
# उदयनराजे भोसले- सातारा
# धनंजय महाडिक- कोल्हापूर
# संजय दिना पाटील -उत्तर पूर्व मुंबई
# सुनील तटकरे- रायगड
# राजेंद्र शिंगणे- बुलढाणा
# गुलाबराव देवकर- जळगाव
# राजेश विटेकर- परभणी
# अनंत परांजपे- ठाणे
# बाबाजी पाटील- कल्याण
# मोहोम्मद फैजल- लक्षद्वीप

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3