Maval: पार्थचा पराभव धक्कादायक; अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा दारुण पराभव झाला. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी तब्बल दोन लाख मताच्या फरकाने पार्थ पवारांना पराभवाची धूळ चारली. पवार कुटुंबातील सदस्यांचा पहिल्यांदाच पराभव झाला आहे. त्यावर ‘आम्ही प्रचंड मेहनत घेतली मात्र, पार्थ पराभव झाला असून हा पराभव ‘धक्कादायक’ असल्याची प्रतिक्रिया पार्थचे वडील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मावळमधून पार्थ पवार यांचा मोठा मताधिक्याने पराभव झाल्याने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पवार घराण्यातील तिस-या पिढीच्या राजकीय कारकिर्दीला मोठा ‘ब्रेक’ लागला आहे. मावळमध्ये आम्ही प्रचंड मेहनत घेतली. जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले.

  • मावळ मतदारसंघातच नाही. तर, देशात सगळीकडे नागरिकांना वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. मात्र, पराभव झाला म्हणून खचून न जाता मावळच्या विकासासाठी मनापासून प्रयत्न करत राहू असेही अजित पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.