Maval : पवना धरण 89 टक्के भरले !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत चालली आहे. पवना धरणात 89.29 टक्के पाणीसाठा झाला आहे. पवना धरण 100 टक्के भरल्यानंतरच पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसाआड सुरु असलेली पाणी कपात रद्द करण्यात येईल, असे महापौर राहुल जाधव यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे धरण 100 टक्के भरण्याची पिंपरी चिंचवडकर वाट पाहत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून धरणातील पाणीसाठा 89.29 टक्के झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

गेल्या 24 तासात झालेला पाऊस 79 मि.मि

1 जूनपासून झालेला पाऊस 2018 मि.मि

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 2140 मि.मि

धरणातील आजचा पाणीसाठा 89.29 टक्के (7.60 टीएमसी)

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 97.45 टक्के (8.29 टीएमसी)

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ 4.42 टक्के*

1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 70.41 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.