Maval : पवना धरण 40 टक्के भरले !

एमपीसी न्यूज-  पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 40.44 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. गेल्या 24 तासात या परिसरात 17 मिमी पाऊस झाला असून 1.04 टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

‌ 1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात 1034 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 26.98 टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी आजमितीला धरणात 49.85 टक्के पाणीसाठा होता. ‌पवना धारण भरू लागले असले तरीही पिंपरी चिंचवड महापालिकेने अद्याप पाणीकपात रद्द केलेली नाही. त्यामुळे पावसाळा असूनही शहरातील अनेक भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.