Maval : पवना धरण 79.66 टक्के भरले!; धरण पाणलोट क्षेत्रात 112 मिमी पावसाची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात 79.66 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात 9 वाजेपर्यंत 112 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे सकाळपासून पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु, त्यानंतर दहा दिवस पावसाने दडी मारली. मागील काही दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. पवना धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पाणीकपात रद्द होईल, अशी अपेक्षा पिंपरी चिंचवडकर व्यक्त करीत आहेत.

  • 1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात 1858 मिमि पावसाची नोंद झाली आहे. आजमितीला धरणात 79.66 टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकण भागासह धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे आढळत आहे. पाणी साठा अधिक प्रमाणात वाढल्यास पुढील काही महिन्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांना उपलब्ध होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.