Maval : पत्रा उचकटून दोन मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज – पहाटेच्या वेळी खोलीचा पत्र उचकटून (Maval) एका चोरट्याने खोलीतून दोन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 31) पहाटे चार वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे घडली.

त्याच्या मूल नादर मन्सुरी (वय 22, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रज्वल बाळासाहेब मोडवे (वय 22, रा. जाधववस्ती, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Sinhgad Road : ग्राहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; वाईन शॉप मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भंगार गोळा करण्याचे काम करतात. बुधवारी (Maval) पहाटे ते त्यांच्या खोलीत झोपलेले असताना आरोपीने खोलीचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. खोलीतून 19 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.