Maval : राष्ट्रवादी मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक सेलच्या ज्येष्ठ सल्लागार पदी पोपटराव वहिले

एमपीसी न्यूज – वडगावचे माजी सरपंच तसेच (Maval )मावळ तालुका देखरेख सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष पोपटराव मारूतराव वहिले यांची राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक सेलच्या ज्येष्ठ सल्लागारपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, तसेच ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष विष्णु शिंदे यांनी पोपटराव वहिले यांना दिले आहे.
यावेळी मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, उपसभापती नामदेव शेलार, देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड कृष्णा दाभोळे,तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, वडगाव शहराध्यक्ष प्रवीण ढोरे,रणजित हिंगे,शैलेश वहिलेसह पदाधिकारी उपस्थित होते.
वहिले हे वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सलग 25 वर्ष चेअरमन देखील होते. उपस्थित मान्यवरांनी निवडीबद्दल वहिले यांचा सत्कार केला.तसेच वहिले यांचा वाढदिवस (Maval) असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे व सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.