Maval : प्रमोद देशक यांची मावळ लोकसभा ‘फ्रेंडस ऑफ बीजेपी’ संयोजक पदी निवड

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या (Maval) वतीने फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये संयोजक, सहसंयोजक तसेच 48 लोकसभेच्या संयोजक नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत. यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी संयोजक म्हणून प्रमोद मधुकर देशक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या फ्रेंड्स ऑफ बीजेपी कार्यकारणी मध्ये प्रत्येक लोकसभेसाठी संयोजक नेमण्यात आले असून मावळ लोकसभेसाठी प्रमोद मधुकर देशक हे काम पाहणार आहेत. प्रमोद मधुकर देशक हे संघ स्वयंसेवक असून लोकांमध्ये व्यापक जन संपर्क असून तसेच तळेगाव दाभाडे शहरातील भारतीय जनता पक्ष संघटनेमधील उपाध्यक्ष, चिटणीस सरचिटणीस, खजिनदार या जबाबदाऱ्या यशस्वी रीतीने देशक यांनी पार पाडल्या आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, शहराध्यक्ष रवींद्र माने (Maval) व संघटनेतील सर्व पदाधिकारी कडून व सर्व स्तरांमधून अभिनंदन करण्यात आले आहे.
पक्षाची विचारधारा कार्यपद्धती व विकास निती जनमानसा पोहचविण्यासाठी तसेच एखादी घटना किंवा जनहित कारी योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी “फ्रेंड्स ऑफ बीजेपी” हे अभियान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केले आहे.