Maval: पडळकर यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने

Maval: Protests in front of tehsildar's office by NCP against Gopichand Padalkar

वडगाव मावळ – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवार (दि 25) रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, आमदार सुनील शेळके यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

उपस्थितांमध्ये मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, तळेगाव शहर अध्यक्ष गणेश काकडे, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा कदम, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, तालुका युवक अध्यक्ष व सरपंच सुनील दाभाडे, तालुका युवक कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, तालुका युवक अध्यक्ष ग्रामीण कैलास गायकवाड,महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, तळेगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुनीता काळोखे,वडगाव शहर महिला अध्यक्षा ज्योती जाधव, वडगाव शहर अध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र कुडे आदी उपस्थित होते.

या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समिती  माजी सभापती अशोक घारे, ज्येष्ठ नेते काळूराम मालपोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बबन भोंगाडे, संघटनमंत्री नारायण ठाकर, ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, माजी सरपंच तुकाराम तथा बुवा ढोरे, युवा नेते निलेश राक्षे, जिल्हा वाहतुक संघटनेचे अध्यक्ष नामदेव शेलार, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनाथ चोपडे, ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अफताब सय्यद, युवा नेते राजेश बाफना, तळेगाव शहर युवक अध्यक्ष आशिष खांडगे, आंदर मावळ युवक अध्यक्ष विक्रम कलवडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रोहिदास गराडे, वडगाव शहर युवा अध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, युवा नेते वैभव पिंपळे, युवा नेते सोमनाथ धोंगडे आदी सहभागी झाले होते.

आमदार सुनील शेळके, अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव आदींनी आपल्या भाषणातून आमदार  गोपीचंद पडळकर यांच्यावर खरपूस समाचार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.