Maval : स्थानिक गुन्हे शाखेकडून एका चोरट्याला अटक; तीन पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एका चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन, कामशेत पोलीस ठाण्यातील दोन आणि लोणावळा पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सुदाम संबाजी भांगरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस जुना पुणे-मुंबई महामार्गावर गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी पिंपळोली कामशेत येथे थांबला आहे. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून सुदाम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह मिळून वडगाव मावळ, कामशेत आणि लोणावळा पोलीस ठाण्यात हद्दीत चोरीचे सहा गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, पोलीस कर्मचारी प्रकाश वाघमारे, सचिन गायकवाड, गणेश महाडिक, एस एस माने यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.