Maval : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून माळेगावमधील प्राथमिक उपकेंद्राच्या नवीन बांधकामासाठी 1 कोटी मंजूर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा सुदाम कदम यांच्या प्रयत्नातून टाकवे – वडेश्वर मतदारसंघातील टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे आंदर मावळमधील माळेगाव येथे प्राथमिक उपकेंद्राचे नवीन बांधकाम करण्यासाठी सुमारे 1 कोटी 7 लक्ष 50 हज़ार रुपये पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मंजूर करुन घेतलेले आहेत.

माळेगाव येथे आरोग्य केंद्र सुरु होणार असल्याने या भागातील लोकांना जवळच आणि पुर्णवेळ आरोग्य सेवा उपलब्ध होईल व जनतेची आरोग्याबाबत होणारी फरफट कमी होणार आहे, असे मनोगत जिल्हा परिषद सदस्या शोभा सुदाम कदम यांनी व्यक्त केले. त्यांच्या या कार्याबद्दल टाकवे – वडेश्वर मतदारसंघातून शोभा कदम यांचे कौतुक केले जात आहे.

आंदर मावळातील अतिदुर्गम असणाऱ्या पश्चिम पट्यातील आदिवासी लोकांना या उपकेंद्राचा खूप फायदा होणार. त्यामधे कुणे, अनसुटे , कुणेवाडी, माळेगाव बु,पिंपरी, तळपेवाडी, माळेगाव खु , सावळा, आढारवाडी, गोन्टेवाडी,ढोंगेवाडी,कळकराई या सर्व गावातील नागरिकांना उपचारासाठी ३०/३२ किलो मीटर आंतरावर टाकवे, वडगाव, तळेगाव या ठिकाणी जावे लागत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.