Maval: सार्वजनिक बांधकाम खात्याकडून लवकरच ‘तळेगाव दाभाडे’ असे नामफलक लागतील – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे लवकरच सर्वत्र ‘तळेगाव’ ऐवजी ‘तळेगाव दाभाडे’ असे नामफलक लागतील. त्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करू, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली. 

तळेगावच्या राजघराण्यातील सरदार सत्यशीलराजे दाभाडे व श्रीमंत राजमाता वृषालीराजे दादाराजे दाभाडे यांनी आमदार शेळके यांची भेट घेतली व या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यावेळी शेळके यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकरी कार्यालयाने सात जुलै 2018 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वत्र ‘तळेगांव’ चे “तळेगांव दाभाडे” असे नामफलक बदलण्याचे आदेश दिले होते. त्याला दोन वर्षे होत आली तरी सुध्दा त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्या संदर्भात सत्यशीलराजे यांनी आमदार शेळके यांच्यापुढे नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या संदर्भातील आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे आश्वासन शेळके यांनी दिले व तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी राजमाता वृषालीराजे यांचे आशीर्वाद घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like