Maval : देवले गावात आढळला 12 फुट लांबीचा अजगर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रात दुर्मिळ असलेला आणि कायद्याने संरक्षित असलेला अजगर देवले गावात आढळून आला. वन्यजीवरक्षक संस्थेच्या सदस्यांनी त्याला पकडून कात्रजच्या प्राणी संग्रहालयात पाठवले.

देवले गावातील स्थानिक रहीवाशी मयूर बाळू आंबेकर यांना शिक्षणग्राम अनाथाश्रम शेजारी अजगर जातीचा साप दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य दक्ष काटकर, शंकर आंबेकर, सचिन वाडेकर यांना त्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दुपारी तीन वाजता घटनास्थळी पोहचले व संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे यांना कळवुन त्या अजगरास सुरक्षितरीत्या पकडण्यात आले.

यासाठी त्यांना स्थानिक रहिवासी मयूर आंबेकर, रोशन येवले, आतिष आंबेकर, सागर ठोसर व टिमचे इतर सदस्य निलेश गराडे, नयन कदम, प्रथमेश मुंगेकर, निनाद काकडे, मयुर दाभाडे, सुरज शिंदे, रोहन ओव्हाळ, कुणाल खैरनार आणी जिगर सोलंकी यांची मदत लाभली.

या अजगराची मान वाकडी झाल्यामुळे कदाचित त्या अजगरास भक्ष्य गिळण्यास त्रास होत असावा यासाठी त्यास पुढील उपचारासाठी तळेगाव येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटल येथे नेण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टर दडके मॅडम यांनी प्राथमिक उपचार करून त्यास कात्रज येथील प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आले आहे असे टिमचे अध्यक्ष निलेश गराडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.