Maval : कामशेत जवळील रेल्वे फाटक मंगळवारी राहणार बंद

Railway gates near Kamshet will remain closed on Tuesday

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोहमार्गावर असलेल्या कामशेत रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक (नाणे गेट) मंगळवारी (दि. 16) बंद राहणार आहे.

रेल्वे विभागाकडून रेल्वे रुळांची आणि इतर दुरुस्ती आणि देखभालीची कामे केली जात आहेत. मंगळवारी कामशेत रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नाणे गेटजवळ हे देखभालीचे काम केले जाणार आहे.

त्यामुळे नाणे गेट मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. नागरिकांनी रेल्वे विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.