Maval : राजमाता जिजाऊ महिला मंचच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणार -सारिका संजय भेगडे

एमपीसी न्यूज – राजमाता जिजाऊ महिला मंचच्या माध्यमातून फॅशन डिझायनिंग क्लासेस प्रशिक्षण पूर्ण झालेल्या १२० प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र वाटपचा कार्यक्रम राजमाता जिजाऊ महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा सारिका संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडला.

राजमाता जिजाऊ महिला मंचच्या माध्यमातून मावळ तालुक्यात महिलांना मोफत फॅशन डिझाईनींग प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून त्यामध्ये महिलांना लहान मुलांच्या कपड्यांपासून ते मोठया वयोगटातील वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईनचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत व प्रशिक्षण कालावधी संपूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र राजमाता जिजाऊ महिला मंचच्या माध्यमातून दिले जात आहे.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलेला भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरिता प्रमाणापत्राच्या माध्यमातून कोणत्याही बँकेतून १लाख रुपयांचे कर्ज व शासनाची नोकरी मिळवण्यासाठी देखील फायदा होणार असून आत्तापर्यंत २५० महिलांनी प्रशिक्षण राजमाता जिजाऊ महिला मंचच्या माध्यमातून घेतले असून संपूर्ण मावळ तालुक्यात प्रत्येक महिलेला ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहीती अध्यक्षा सारिका संजय भेगडे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळेगांव नगराध्यक्ष चित्रा जगनाडे,पंचायत समिती सदस्य निकिता घोटकुले, वडगाव उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर, कॅन्टोन्मेंट सदस्य अरुणा पिंजण, सुमित्रा जाधव, भाजपा तळेगांव शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, युवा तालुकाध्यक्ष संदीप काकडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, तळेगांव दाभाडे नगरपरिषद सर्व नगरसेविका, वडगाव नगरपंचायत सर्व सदस्या, राजमाता जिजाऊ महिला मंच सदस्या व प्रशिणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.