Maval Rape Case : जांभवडेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार,19 वर्षीय तरुणास अटक

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील जांभवडे येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला अटक (Maval Rape Case) केली आहे. मुलगी गरोदर राहिल्याने साडेतीन महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला. 
अनिल बाळू गावडे, (वय 19, रा. सांगुर्डी, ता. मावळ) असे बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.
ही घटना मार्च व एप्रिल 2022 मध्ये मावळ तालुक्यात जांभवडे (Maval Rape Case) येथे घडली. या प्रकरणी 16 जूनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ही तिच्या चुलत भावाच्या घरात त्याच्या मुलांना खेळण्यासाठी बोलावण्यास गेली असता आरोपीने घरामध्ये फिर्यादीवर जबरदस्तीने बलात्कार करून सदरचा प्रकार कोणास न सांगणे बाबत धमकी दिली.

 

Sonali Patil Accident : अभिनेत्री सोनाली पाटील यांचा चाकण मध्ये अपघात; उपचारानंतर डिस्चार्ज

फिर्यादीच्या पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात तिची वैद्यकीय तपासणीत ती साडेतीन महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार केल्याने गुन्हा (Maval Rape Case) दाखल करण्यात आला आहे.
आरोपी गावडे याच्यावर भा. द. वि. कलम 376(2)(आय), 506 सह पोक्स कायदा कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MLC Election 2022 : आदित्य ठाकरे रात्री साडेबारा वाजता शिवसेना आमदारांच्या भेटीला, हॉटेलमध्येच मुक्काम

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.