Maval : इंगळूण व सावळा येथील 200 कुटुंबांना शिधा व जीवनावश्यक वस्तूंची मदत

Maval: rations and Essential goods to 200 families in Ingalun and Savla

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची झळ ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणात बसली आहे. या पार्श्वभूमीवर  हिंजवडी व हाँगकाँग येथील नॉर ब्रेमसे ग्लोबल केअर – एशिया पॅसिफिक कंपनी तसेच तळेगाव दाभाडे येथील वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंदर मावळातील ग्रामपंचायत इंगळूण व सावळा यांच्या हद्दीत येणाऱ्या गावांमधील 200 कुटुंबाना एक महिन्याचा शिधा, सॅनिटायझर, गरजेच्या वस्तू देऊन मदतीचा हात दिला. 

ग्रामीण अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेतीवर व त्यावर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांवर अवलंबून असते. कोरोनाच्या महामारीच्या व लोकडाऊनच्या काळात ना शेतात काम आहे, ना शेतमालाला भाव, अशा स्थितीत हजारो- लाखो लोक जे दुसऱ्यांच्या शेतीवर राबतात त्यांची स्थिती या काळात दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. त्यातच त्यांना आधार देणारे कमवते हात जे शहरांमध्ये होते त्यांना देखील बेरोजगारीमुळे गावाकडे वळावे लागले आहे.

अशा स्थितीत खास करून ज्येष्ठ नागरिक, अपंग, एकल महिला, मजूर यांना जास्त मदतीची गरज आहे. हीच स्थिती लक्षात घेऊन  नॉर ब्रेमसे ग्लोबल केअर – एशिया पॅसिफिक कंपनीच्या हिंजवडी आणि हाँगकॉंग शाखा तसेच वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्थेने अंदर मावळातील ग्रामपंचायत इंगळूण व सावळा यांच्या हद्दीत येणाऱ्या गावांमधील 200 कुटुंबाना एक महिन्याचे रेशन, सॅनिटायझर, गरजेच्या वस्तू देऊन मदतीचा हात दिला. पुढील काळात या विभागामध्ये शिक्षणावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा नॉर ब्रेमसे कंपनी व वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्था यांचा मानस आहे.

कार्यक्रमाच्या वेळी इंगळूण ग्रामपंचायत ग्रामसेवक जगन्नाथ शिदोरे, सरपंच शोभाताई धिंदळे, सावळा ग्रामपंचायत ग्रामसेवक हुजरे, सरपंच नामदेव गोंटे उपस्थिती होते. गरजूंना मदतीसोबत कोरोना प्रतिबंधावर शास्त्रीय माहिती संस्थेच्या श्रद्धा तेलंगे यांनी दिली. या विभागातील गरजू विद्यार्थ्यांना पुढील काळात शैक्षणिक मदत हवी असल्यास त्यांनी संस्थेशी [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा तसेच संस्थेच्या कार्याविषयी माहितीसाठी www.workforequality.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी केले आहे.

Hand wash awareness

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.