Maval Corona Update : मावळात गुरुवारी 33 रुग्णांची नोंद; 8 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

Maval recorded 33 patients on Thursday; 8 discharged, 3 dead : कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 704

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरुवारी, दि. 30) 33 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 704 झाला आहे. तर आज 8 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 25 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 8 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

यामध्ये चांदखेड, उर्से, सोमटणे, कान्हे, फळणे, आढे खु., कुणे नामा., वडेश्वर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

शहरी भागात सापडलेल्या 25 रुग्णांपैकी 12 रुग्ण तळेगाव शहरातील आहेत. लोणावळा शहरातील 13 रुग्ण आहेत. तर वडगाव नगर पंचायत क्षेत्रात आज एकही रुग्णाची नोंद झाली  नाही.

कोरोनाबाधित एकूण 704 रुग्णांमध्ये सध्या 425 रुग्ण सक्रीय आहेत. तर 262 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयात 215 आणि होम आयसोलेशनमध्ये 210 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.