Maval : प्लास्टिक पाईपच्या तुकड्यात अडकलेल्या धामण सापाला जीवदान

एमपीसी न्यूज : – प्लास्टिक पाईपचा लहान तुकडा एका सापाच्या ( Maval ) शरीरावर अडकला होता. पाईपच्या तुकड्यात साप अडकल्याने त्याला श्वास घेता नव्हता. हा साप तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात आला असता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी त्याची प्लास्टिक पाईपमधून सुटका करून त्याला जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

तळेगावचे माजी नगरसेवक संदीप शेळके यांनी गुरुवारी (दि. 18) वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना फोन करून माहिती दिली की, तळेगाव-चाकण रोडवर इंद्रायणी मंगल कार्यालयात स्वयंपाक घरात एक साप आहे. त्यानुसार गराडे यांनी संस्थेचे सदस्य भास्कर माळी आणि संकेत मराठे यांना इंद्रायणी मंगल कार्यालयात पाठवून दिले.

Pimpri : प्रा. तेजस्विनी शेवते- उ-हे यांना पीएचडी प्रदान

माळी आणि मराठे यांनी पाहणी केली असता मंगल कार्यालयाच्या स्वयंपाक घरात एक धामण जातीचा साप होता. त्याच्या शरीरावर एक प्लास्टिक पाईपचा तुकडा अडकला होता. त्यामुळे सापाला जास्त हालचाल करता येत नव्हती. तसेच व्यवस्थित श्वास देखील घेता नव्हता. भास्कर माळी आणि संकेत मराठे यांनी धामण पकडली आणि तिच्या शरीरावर अडकलेला पाईपचा तुकडा कापून व्यवस्थित बाहेर काढला.

सापाला पाणी पाजून शांत केले. त्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. आपल्या परिसरात साप आढळल्यास तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्था (9822555004) अथवा वन विभागाला (1926) माहिती द्यावी, असे आवाहन निलेश गराडे यांनी केले ( Maval ) आहे.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share