Maval : रोहित चव्हाण यांची मावळ विधानसभा भाजपा विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – इंदोरी-मावळ येथील रोहित सुनील चव्हाण यांची मावळ विधानसभा भाजपा विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

पुणे जिल्हा भाजपा ग्रामीणचे अध्यक्ष गणेश किसन भेगडे, मावळ विधानसभा भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कार्याध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजपा युमो चे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, नगरसेवक अरुण भेगडे, माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर, जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण, सोमाटणे गणाचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष प्रतीक बोडके, युवा नेते समीर पवार यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयांनी कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासन रोहित चव्हाण यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.