Maval : तिकोणा गडावर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – किल्ले तिकोणा गडावर प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. रांगोळी, झेंडे, अब्दागिरी यांच्या सजावटीत आणि ढोलताशांच्या गजरात गडावरील वातावरण शंभुमय झाले.

तळजाई माता लेणी परिसरात संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मावळ अँडव्हेन्चरचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ जावळीकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांनी यांनी ढोल-ताशाच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली. त्यानंतर शिववंदना घेण्यात आली.

पहाटेपासून संभाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी सुरु झाली. सडा-रांगोळी घालून फुलांची आरास करण्यात आली. भल्या पहाटे सर्व मावळे गडावर मार्गस्थ झाले. गडावर सर्व देवी-देवतांचे पूजन झाले. अब्दागिरी, झेंडे यांची सजावट करण्यात आली. संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने या जयंतीचे आयोजन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.