Maval : शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी संदिप मालपोटे

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या (Maval) अध्यक्षपदी संदिप जयवंत मालपोटे तर उपाध्यक्षपदी गणेश लक्ष्मण काटकर यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी माजी अध्यक्ष अनिल असवले, माजी चेअरमन विकास असवले,संतोष होले आदी मान्यवर उपस्थित होते.

Pimpri : Pimpri : निरक्षरांच्या सर्वेक्षणावर 982 शिक्षकांचा बहिष्कार

संदीप मालपोटे हे सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून सामाजिक काम करत आहेत. यावेळी मुख्याध्यापक वंदना असवले यांनी काम पाहिले. यावेळी सदस्यपदी उर्मिला शिंदे, (Maval) नीलम गायकवाड, श्रीकांत मोढवे, अनुराधा जाधव, मीना वाघमारे, सुनील मोरे, सारिका कोंडे यांची निवड करण्यात आली.

या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप मालपोटे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.