Maval : रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने मावळ परिसरातील रुग्णालयांना सॅनिटायझरचे वाटप

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने मावळ परिसरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांना सॅनिटायझर देण्यात आले. रुग्णालयांना देण्यात येणारे सॅनिटायझर क्लबच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष विजय काळभोर, रवी राजापूरकर, हरविंदर सिंग, साक्षी डायग्नोस्टिक आणि स्वराज्य मित्र मंडळाचे ब्रिजेंद्र किल्लावाला, नितीन खळदे, मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या मार्फत हे सॅनिटायझर देण्यात आले.

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या विषाणूचा भारतातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ निगडी वतीने वडगाव आणि संपूर्ण मावळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्राला व रुग्णालयांना मोफत सॅनिटायझर देण्यात आले.

समर्थ हॉस्पिटल, ढाकणे हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल, नांगरे हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, पाटील हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, तळेगाव नगरपरिषद रुग्णालय, पीएसयु डॉ. कानडे, सुनील शेळके फाऊंडेशन, पीएसयु डॉ. लोहारे 5 नंबर, डॉ. बडे हॉस्पिटल, डॉ. बडे न्युलाईफ हॉस्पिटल, सुभश्री हॉस्पिटल, डॉ. कणसे हॉस्पिटल.

तसेच कामशेत येथील कामशेत हॉस्पिटल, इंद्रायणी हॉस्पिटल, महावीर हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा येथील शारदा हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, सरस्वती हॉस्पिटल, कल्पतरू हॉस्पिटल, डॉ. सुनीत सोलंकी, डॉ. शाह हॉस्पिटल, लोणावळा पोलीस टोल नाका, लोणावळा पोलीस कुमार रिसॉर्ट शेजारी, डॉ. भोगले, डॉ. वाघमारे, आनंद हॉस्पिटल, सुहास मेडिटेक (मायमर), एच पी गॅस एजन्सी, नेटके गॅस एजन्सी, साक्षी डायग्नोस्टिक, स्टार हॉस्पिटल आदींना सॅनिटायझर देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.