Maval School News : इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरु

एमपीसीन्यूज : इंदोरी ( ता. मावळ) येथील चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कुलमध्ये शासनाच्या आदेशानुसार इयत्ता नववी व दहावी पर्यंतचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यात आले.

सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाय योजना याबाबत शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर पालकांची लेखी संमती घेण्यात आली. वर्ग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळा सॅनिटायझ करण्यात आली.

कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळेच्या मुख्य फलकावर सूचना दिल्या आहेत. तसेच शाळेच्या आवारात आणि वर्गातही जागोजागी कोरोना जनजागृतीबाबत भित्तीपत्रके लावण्यात आलेली आहेत. सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.

दरम्यान, शाळा सुरु झाल्यानंतर उत्साहात विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केला. थर्मलगण व ऑक्सीमीटरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था केलेली आहे.

दोन्ही वर्गाच्या बाहेर सॅनिटायझर व हात धुण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची सक्ती ही विद्यार्थ्यांना केली आहे. सध्या दररोज चार तासिका घेतल्या जातात.

संस्थेचे संस्थापक भगवान नारायण शेवकर आणि मुख्याध्यापिका हेमलता खेडकर यांनी शाळेची पाहणी करून इयत्ता नववी व दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.