Maval: दुय्यय निबंधक कार्यालयाने आठ दिवसांत मिळविला 61 लाखाचा महसूल; गणेश काकडे यांनी केले अधिकाऱ्यांचे कौतुक

Secondary Registrar's Office earns Rs 61 lakh in eight days; Ganesh Kakade praised the officers

एमपीसी न्यूज – मावळमधील दुय्यम निबंधक कार्यालयाने  कोरोना संसर्गाच्या  प्रतिकुल परिस्थितीत सर्व उपाययोजना राबवत यशस्वीरित्या दस्त नोंदणी चालू केली.  मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, पाने फी पोटी आर्थिक मंदीच्या काळातही 8 दिवसात  61 लाख 56 हजार 700 रुपये इतका महसूल  जमा करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 

यानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सत्कार केला. तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर, मास्क देत यापुढेही योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

लॉकडाउनमुळे पुणे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक, मुंद्राक कार्यालये महिनाभर  बंद होती. यामुळे ग्रामीण भागातील खरेदी-खते, इतर गरजेचे दस्तऐवजांची नोंदणी ठप्प झाली होती. त्यामुळे सामान्य जनतेची अडचण झाली होती.

राज्य सरकारचा महसूलही ठप्प झाला होता.  त्यासाठी मावळमधील दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केली होती.  त्याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्यांच्या पाठपुराव्याने मावळमधील दुय्यम निबंधक कार्यालये 18 मे पासून कार्यान्वित करण्यात आले.

दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचा-यांनी कोरोना संसर्गाच्या  प्रतिकुल परिस्थितीत सर्व उपाययोजना राबवत यशस्वीरित्या दस्त नोंदणी चालू केली. कालअखेर  मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व पाने फी पोटी आर्थिक मंदीच्या काळातही केवळ 8 दिवसात 61 लाख 56 हजार 700 रुपये इतका महसुल जमा केला. या कामगिरीनिमित्त त्यांचे कौतुक केले जात आहे.

अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची दखल घेत विरोधी पक्षनेते गणेश  काकडे यांनी कार्यालयास भेट देत  सर्वांचे आभार मानले.

तसेच कार्यालयातील कर्मचारी व कार्यालयात येणारे पक्षकार यांचे कोरोना संसर्गापासुन सरंक्षण व्हावे यासाठी राबवित असलेल्या उपाययोजनाबाबत कौतुक करत सॅनिटायझर, मास्क दिले. यापुढेही योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.