Maval News: सात रोटरी क्लबने एकत्र येत मावळातील विद्यार्थ्यांसाठी घेतली ऑनलाइन कार्यशाळा

Maval: Seven Rotary clubs come together and hold an online workshop for Maval's students 'दिशा करियरचे' शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मोरे यांनी या झूम मिटिंग अ‍ॅपद्वारे दहावीच्या विद्यार्थांना त्यांच्या आवडी निवडी जाणून त्यांना मार्गदशन केले.

एमपीसी न्यूज- दहावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना मावळ तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ लोणावळा, रोटरी क्लब ऑफ देहुरोड, रोटरी क्लब ऑफ तळेगाव, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, रोटरी क्लब ऑफ देहु व रोटरी क्लब ऑफ मावळ यांच्या सहकार्याने झूम अ‍ॅपच्या माध्यमातून डॉ. राजेंद्र मोरे यांनी मार्गदर्शन करत करिअरच्या विविध वाटा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

मावळातील रोटरी क्लब असे अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी घेत असतात विद्यार्थ्यांना आपले करियर कसे करावे यासाठी दरवर्षी मार्गदर्शन कार्यशाळा घेत असतात. परंतु, यावर्षी कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यशाळा घेता येत नव्हती. मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची गरज ओळखून मावळ तालुक्यातील सात रोटरी क्लबनी एकत्र येत झूम अ‍ॅपच्या सहाय्याने एक अभिनव उपक्रम शुक्रवारी (दि.7) सायंकाळी पाच ते सात या वेळात पार पडला.

यामध्ये ‘दिशा करियरचे’ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मोरे यांनी या झूम मिटिंग अ‍ॅपद्वारे दहावीच्या विद्यार्थांना त्यांच्या आवडी निवडी जाणून त्यांना मार्गदशन केले. तसेच दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे अकरावी प्रवेश प्रक्रिया याबद्दलची माहिती विद्यार्थांना दिली.

विद्यार्थांनी त्यांना विविध प्रश्न देखील विचारले. मावळ तालुक्यातील 250 विद्यार्थी ऑनलाइन करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत प्रमूख पाहुण्या रो. प्रातंपाल रश्मी कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. गिरीश लांडगे, रो. गणेश कुदळे, रो. सुशीला आरोरा, रो. सुबोध मालपाणी, रो. वसंत माळुंजकर आदी या ऑनलाइन कार्यशाळेत उपस्थीत होते.

कार्यशाळा यशस्वितेसाठी रोटरी क्लब लोणावळा अध्यक्ष राजेश गायकवाड, देहुरोड अध्यक्ष अतुल कामत, तळेगाव दाभाडे अध्यक्ष राहुल दांडेकर, तळेगाव सिटी अध्यक्ष संतोष शेळके, तळेगाव एमआयडीसी अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, मावळ अध्यक्ष रवींद्र घारे, देहु अध्यक्ष अजित चव्हाण यांच्यासह सातही रोटरी क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.