Maval : खानावमधील ‘शेकाप’च्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

एमपीसी न्यूज – पनवेल तालुक्यातील खानाव येथील शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 16) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शेकापने केलेल्या अन्यायाला कंटाळून त्यांनी पक्षप्रवेश केला असल्याचे सांगितले. पनवेल तालुक्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले.

ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ फराटे, तुळशीराम तातडे, दिलीप पाटील, शिवाजी कर्णूक, बाबुराव कर्णूक, बाळाराम कर्णूक, आतिष कर्णूक, उमेश कर्णूक, मंगेश कर्णूक, अनंता कर्णूक, अविनाश मुंढे आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, अरुण भगत, रामदास पाटील, बबनदादा पाटील, जगदीश गायकवाड, परेश पाटील, रघुनाथ पाटील, अवचित राऊत, राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, केवल माळी, शांताराम कुंभार, नितीन पाटील, विश्वास पेटकर, एकनाथ देशेकर, रुपेश पाटील, कैलास पाटील, रमेश म्हात्रे, गौरव गायकवाड, सुधीर पाटील, संजय पाटील, बाळाराम कोंडू पाटील आदी उपस्थित होते.

महायुतीला निवडून देण्यासाठी तसेच पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना पक्षाने कार्यकर्त्यांवर कायम अन्याय केला. न्यायाची भूमिका कधीच बजावली नाही. तर माजी खासदार राम ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमी विकासाला चालना देत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार प्रगतीला अनुकूल असणारी विकासकामे केली. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणे संयुक्तिक आहे, अशा भावना ‘शेकाप’वर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. तसेच खानाव गावातून महायुतीला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार असल्याचा विश्वास देखील सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.