BNR-HDR-TOP-Mobile

Maval: शिलाटणे ग्रामपंचायत बिनविरोध; सरपंचपदी गुल‍ाब आहिरे

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शिलाटणे ग्रामपंचायतीने आदर्शवत काम करत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध केल्या आहेत. लोणावळा ग्रामीण भागातील शिलाटणे,औंढे -औंढोली व टाकवे खुर्द या तीन ग्रामपंचयात निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. काल अर्ज माघारीच्या दिवशी मावळ तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे यांनी शिलाटणे गावातील तसेच परिसरातील सर्वपक्षीय नेते मंडळी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करत गावाच्या विकासाकरिता ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याकरिता केलेल्या शिष्टाईला ग्रामस्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिलाटणे ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध पार पडली.

शिलाटणे ग्रामपंचायतीचे सरंपच पद हे अनुसुचीत जातीसाठी आरक्षित आहे, याजागेकरिता पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. सर्व इच्छूकांशी चर्चा करत त्यांच्यामध्ये चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये गुलाब विठ्ठल आहिरे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.

  • सदस्यपदी वार्ड क्रमांक १ मधून कांचन शरद भानुसघरे ह्या दुसऱ्यांदा बिनविरोध झाल्या तसेच माधुरी रामदास भानुसघरे आणि मनिषा दत्ता भानुसघरे. वार्ड क्र २ मधून निर्मला बाळासाहेब भानुसघरे, सोनाली सुशील येवले व शरद भीमाजी आहिरे, वार्ड क्र ३ मधून जनाबाई विनायक कोंडभर, अश्विनी मच्छिंद्र भानुसघरे व रुपाली दत्ता कोंडभर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विशेष बाब म्हणजे बाळासाहेब नथु कोंडभर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने सदर निवडणूक बिनविरोध होण्यास सोपे झाले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, मावळ सचिव संघटना अध्यक्ष गणपतराव भानुसघरे, माजी सरपंच हेमंत भानुसघरे, तानाजी भानुसघरे, ज्ञानदेव भानुसघरे, संभाजी येवले, भरत कोंडभर, ज्ञानदेव भानुसघरे, अनिल भानुसघरे, अमोल केदारी, प्रदिप हुलावळे, समीर हुलावळे, शांताराम भानुसघरे, बाबाजी भानुसघरे, विनायक कोंडभर, नाथा कोंडभर, संतोष भानुसघरे, संग्राम भानुसघरे यांचे योगदान लाभले.

  • गावाच्या विकासासाठी सर्वानीं एकोप्याची भावना, समजूतदारपणा, मनाचा मोठेपणा दाखवून काही उमेदवारांनी माघार घेत निवडणुक बिनविरोध केली. आता बिनविरोध निवड झालेल्या सर्व सदस्यांनी व सरपंच यांनी सर्व ग्रामस्तांना सोबत घेत गावात विकास कामांची गंगा आणत तालुक्यात आदर्श निर्माण करुन दाखवावा अशी भावना दीपक हुलावळे व मान्यवरांनी यानिवडीच्या वेळी व्यक्त केली.
HB_POST_END_FTR-A2

.