BNR-HDR-TOP-Mobile

Maval/ Shirur: सार्वजनिक सुट्टी उमेदवारांच्या पथ्यावर; प्रचाराला उरले दहा दिवस

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – प्रचारासाठी केवळ 10 दिवस राहिल्याने मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रचारासाठी दमछाक झाली आहे. आज (बुधवारी)महावीर जयंतीची सुट्टी आहे. शुक्रवारी (दि.19) गुड फ्रायडेची सुट्टी आहे. तर, रविवार (दि.21) हा प्रचारासाठी शेवटचा रविवार असणार आहे. सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे या कालावधीमध्ये उमेदवारांकडून प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. भेटी-गाठीवर भर देण्यात येत आहे.

मावळमध्ये 21 आणि शिरुरमधून 23 उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. 29 एप्रिलला या दोन्ही मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. प्रचारासाठी केवळ 10 दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी दिवस-रात्र एक करावा लागणार आहे. येणारा रविवार हा प्रचारासाठी शेवटचा रविवार असणार आहे. 17 एप्रिलला महावीर जयंती आहे. 19 तारखेला हनुमान जयंती व गुड फ्रायडे आहे.

महायुती आणि महाआघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सुट्टीतील प्रचाराचे नियोजन केले जात आहे. उमेदवारांची माहिती देणारी पत्रके प्रत्येक घरोघरी जाऊन वितरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागनिहाय रॅलींचेही या कालावधीमध्ये आयोजन केले जाणार आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांना प्रचारासाठी 10 दिवस असले तरी आजची, शुक्रवार आणि रविवार या तीन सुट्या पाच दिवस महत्त्वाचे आहेत. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांची भेट घेण्याचा उमेदवार, पदाधिका-यांकडून प्रयत्न केला जाईल. 27 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचाराचा तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचारासाठी केवळ दहा दिवस राहिले आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.