Maval/ Shirur: बारणे-पवार यांच्यात काटे की टक्कर; आढळराव यांना डॉ. कोल्हे यांचे आव्हान; उद्या मतदान

पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. मावळातून शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यात काटे की टक्कर आहे. तर, शिरुरमधून महायुतीचे शिवाजीराव आढळराव यांना महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी कडवे आव्हान दिले आहे. मावळमधील 21 आणि शिरुरमधील 23 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदानयंत्रात बंद होणार आहे.

घराण्यातील उमेदवार असल्याने पवार कुटुबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाचे राज्यातील पदाधिकारी, घरातील सदस्यांनी मावळात तळ ठोकला होता. पार्थ यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे वडील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांभाळली. पार्थ यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी जाहीर सभा घेतल्या.

  • शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गीते, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे, आदेश बांदेकर यांनी सभा घेतल्या.

शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांना कडवे आव्हान दिले आहे. तीन पंचवार्षिक निवडणुकीत आढळराव यांच्यासमोर पहिल्यांदाच आव्हान निर्माण झाले आहे. आढळराव यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील नऊ ते दहा मंत्र्यांनी सभा घेतल्या. तर, महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्या सभा झाल्या. यांच्यासह मावळमधील 21 आणि शिरुरमधील 23 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदानयंत्रात बंद होणार आहे.

  • मावळ मतदारसंघातून ‘हे’ 21 उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात!
    राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीचे पार्थ पवार, शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे जगदीश शामराव सोनवणे, आंबेडकर राईट्‌स पार्टी ऑफ इंडियाच्या जया संजय पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे पंढरीनाथ नामदेव पाटील, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक, भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील, बहुजन रिपल्बिकन सोशलिस्ट पार्टीचे सुनील बबन गायकवाड

त्याचबरोबर अपक्ष अजय हनुमंत लोंढे, अमृता अभिजीत आपटे, नवनाथ विश्वनाथ दुधाळ, प्रशांत गणपत देशमुख, बाळकृष्ण धनाजी घरत, राकेश प्रभाकर चव्हाण, राजेंद्र मारुती काटे, विजय हनुंमत रंदिल, सूरज अशोकराव खंडारे, सुरेश श्रीपती तौर, डॉ. सोमनाथ अर्जुन पौळ हे 21 उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.