Maval/ Shirur: महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधातील ‘मनसे’च्या प्रचाराचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – भाजप-शिवसेना महायुतीचे मावळातील उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरुरमधील शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधातील प्रचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रचाराचा आज (बुधवारी) शुभारंभ केला आहे. मनसैनिक घरोघरी जाऊन उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. शहरात प्रचाराची डिजिटल गाडी फिरणार आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शहराचे प्रभारी रणजित शिरोळे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, अंकुश पटेकर, विशाल मानकरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात हाक दिली आहे. त्यानुसार मनसेने भाजप-शिवसेना महायुतीच्या विरोधात प्रचार करत आहोत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मनसैनिका कामाला लागले आहेत. मोदी, शहा यांच्यासोबत खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे का नको आहेत ? हे मनसैनिक जनतेला समजावून सांगणार आहेत. भाजपमुळे जनतेला होत असलेला त्रास सांगणार आहोत, असे मनसेच्या नेत्यांनी सांगितले आहे.

शहरात दुचाकी रॅली, पदयात्रा काढल्या जाणार आहेत. कॉर्नर सभा, बैठका घेतल्या जाणार आहेत. शहरात प्रचाराची डिजिटल गाडी फिरणार आहे. त्याच्या माध्यमातून मोदी यांचा खोटेपणा जनतेसमोर आणला जाणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.